मुंबई \ ऑनलाईन टीम
विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी चांगलंच वादळी ठरलं. गदरोळ, शिवीगाळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं.. याच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, निलंबित १२ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन, ही एकतर्फी कारवाई झाली असल्याची तक्रार करत, योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. याचे पडसाद आजही उमटले. या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आधी विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवली. एवढच नाहीतर आता भाजपा १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप ही काही साधीसुधी पार्टी नाही, १०६ आमदार निवडून आलेली पार्टी आहे. आज तुम्ही १०६ आमदार असलेल्या भाजपचा आवाज सभागृहात दाबण्याचा प्रयत्न करत आहात, या विरोधात आम्ही आवाज उठवू. राज्यपालांकडे निलंबित केलेले १२ आमदार गेले होते, आता आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. हा अन्याय आहे. अशाप्रकारचे सगळे निर्णय गोळा केल्यानंतर असं लक्षात येतं की, आपल्याला न्यायालयात न्याय मिळेल. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Previous Articleमी गुन्हा केला असेल तर गजाआड जायला तयार मात्र केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी – प्रताप सरनाईक
Next Article वाढीव वीज बिलाविरोधात कंदील भेट आंदोलन








