प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या संकटामुळे बारावीची परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षेला समोरे जावे लागणार होते. या विरोधात रिपीटर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. रिपीटर विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द करून त्या सर्वांना पास करण्याची मागणी या याचिकेद्वारे केली होती. त्यावर आता राज्यसरकारने रिपीटर विद्यार्थ्यांना 35 टक्के गुणांसह पास करण्याची माहिती दिली आहे.
शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे यावर्षी बारावीची परीक्षा देणारे 6 लाख 72 हजार विद्यार्थी परीक्षेशिवाय पास झाले आहेत. तर यावर्षी पुर्नपरीक्षेसाठी अर्ज केलेले राज्यातील 95 हजार विद्यार्थीही पास झाले आहेत.