सावंतवाडी/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार तीन ऑगस्ट ला दुपारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येईल. यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेल्या महिनाभर राज्यात पडलेला पाऊस पूरस्थितीचा फटका बारावी निकालाच्या प्रक्रियेला बसला आणि आता तीन ऑगस्ट ला हा निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.









