सांगली जिल्ह्यात तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करा –उदय सामंत
सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या साथीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी परीक्षा घेतली जाईल, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगलीत दिली.
जिल्ह्यात योग्य नियोजन केल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.








