मुंबई/प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल राज्य मंडळातर्फे मंगळवारी (३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सोमवारी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारला ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. पण राज्य मंडळाला या आदेशाचे पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा निकाल खालील संकेतस्थळांद्वारे पाहता येणार
https://hscresult.net
11admission.org.in
https://msbshse.co.in
maharesult.nic.in
hscresult.mkcl.org