ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसची आणखी एक लस सप्टेंबरअखेर भारतात मिळू शकेल. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादची फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई सप्टेंबरच्या अखेरीस भारतात आपली कोरोना लस ‘कॉर्बेवैक्स’ आणणार असून ती वापरण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

ही लस जगातील सर्वात स्वस्त लस असल्याचे सांगितले जात आहे. ‘कॉर्बेवैक्स’ लस अमेरिकेत तयार केली जात आहे. भारतात बायोलॉजिकल ई या लसीची निर्मिती करणार आहे. केंद्र सरकारने 50 रुपये प्रति डोस या प्रमाणे 30 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. ही लस बाजारात उपलब्ध झाल्यावर या लसींचे दोन डोस साधारण 400 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. 400 रुपयांपेक्षा कमी किंमत असल्यास ही लस जगातील सर्वात कमी किंमतीची लस असणार आहे.
यासोबतच कंपनीने ऑगस्ट महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला 8 कोटी लस तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आता लसीचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.









