प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील बायणा किनाऱयावरही पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नववर्षाचे स्वागत केले. शुक्रवारी संध्याकाळी या किनाऱयावर लोकांची गर्दी पडली होती. गेल्या काही दिवसांपासून या किनाऱयालाही बहर आलेला आहे.
बायणा किनाऱयालाही गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांकडून प्रतिसाद लाभत आहे. ऐरवी या किनाऱयाकडे पर्यटक फारसे वळत नसतात. मात्र, नववर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकही गेल्या काही वर्षांपासून या किनाऱयाची निवड करू लागलेले आहे. मागच्या वर्षी प्रमाणेच यंदाही नववर्षाच्या माहोलात गेल्या काही दिवसांपासून बऱयाच पर्यटकांनी बायणा किनाऱयाला भेट देऊन आनंद लुटला. सकाळपासून संध्याकाळपासून पर्यटकांची वर्दळ या किनाऱयावर दिसून आली. याचा लाभ किनाऱयावरील जल क्रीडा व्यवसायीकांनाही झाला. तसेच किनाऱयावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा धंदाही तेजीत झाला.
गेले काही दिवस बायणा किनारा लोकांनी फुलून गेला. मुलांना शाळां नसल्यानेही मुला बाळांना घेऊन कुटुंबे या किनाऱयाकडे वळत असतात. यात स्थानिक परप्रांतीय लोकांचाच अधिक भरणा असतो. गुरूवारी संध्याकाळी आणि काल शुक्रवारी संध्याकाळीही नववर्षानिमित्त बायणा किनारा पर्यटक आणि स्थानिक लोकांनी बहरला होता.









