ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिंगणात असलेले जो बायडेन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फॉलो करत भर पावसात सभा घेतली. ही सभा अमेरिकेत प्रचंड गाजली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणणाऱ्या शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा चांगलीच गाजली होती. त्याच पावलांवर जो बायडेन यांनी पावसात सभा घेतली. बायडेन यांच्या सभेवेळी जोरदार वादळी पाऊस आला. तरीही त्यांनी ही सभा सुरूच ठेवली. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
फ्लोरिडा हे राज्य राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. फ्लोरिडात ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडेन यांनी विशेष जोर लावला आहे. दरम्यान, बायडेन यांच्या या पावसातील भाषणामुळे अमेरिकेतील नागरिकांना 12 वर्षांपूर्वीच्या बराक ओबामांच्या सभेची आठवण झाली.









