दोडामार्ग / वार्ताहर:
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व त्यांच्या शिवसैनिकांनी नारायण राणें यांना दोडामार्गात पाय ठेऊ देणार नाही अशा फुकट वल्गना करू नयेत उलट त्यांचेच पाय शिल्लक राहतील की नाही ते पाहावेत असा प्रतीवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणें हे दोडामार्गात येणार असून हिंमत असल्यास धुरी व त्यांच्या शिवसेनेने श्री राणें यांना अडवून दाखवावे असे प्रतिआव्हान श्री. नाडकर्णी व श्री. म्हापसेकर यांनी दिले. काही वर्षांपूर्वी ज्या भगव्याला बाबुराव धुरी यांनी दोडामार्गच्या गांधी चौकात आग लावली होती तेच धुरी आज भगव्याचे गुणगान करत फिरत आहेत. परंतु जनता नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून जे घोटाळे धुरी यांनी केले आहेत. ते लपविण्यासाठीच त्यांना भगव्याचा पर्यायाने शिवसेनेचा आधार घ्यावा लागला आहे. दोडामार्ग मधील अनेक ठेवीदार छोटेमोठे पिग्मी एजंट तसेच दिवसाकाठी आपली मेहनतीची रक्कम पिग्मी च्या स्वरूपात भरणारे व्यापारी यांचे मोठे व कधीही न भरून येणारे नुकसान धुरी यांनी करून ठेवले आहे. याबाबत धुरी बोलण्याची हिंमत करणार काय ? असा सवाल श्री. नाडकर्णी व श्री म्हापसेकर यांनी केला आहे. सुरवातीला जनता दल व त्यानंतरचे अनेक प्रवास केलेल्या बाबुराव धुरींनी शिवसेनेच्या निष्ठेविषयी फुकट वल्गना करू नयेत. आमचे नेते नारायण राणें यांच्या नखाची सुद्धा सर धुरींना नाही. ज्या तालुक्याला नारायण राणें यांनी जन्माला घातले त्या तालुक्यात येण्यापासून श्री राणें यांना रोखणारे बाबुराव धुरी कोण लागून गेलेत ? जनता पतसंस्थेच्या घोटाळेबाज धुरींनी ना. राणें वर बोलणे म्हणजे सूर्यावर थुकंण्यासारखे आहे असेही नाडकर्णी व म्हापसेकर म्हणाले. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रौप्य व अमृत महोत्सव यामधील फरक कळला नाही त्यांनी गेल्या आठवड्यात स्वतंत्र्य दिनी आपले अज्ञानपण साऱ्या राज्याला व देशाला दाखवून दिले. बाबुराव धुरी यांना जर हा फरक माहिती असेल तर त्यांनी तो आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगावा. उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनी देशासाठी आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक तसेच देशवासीयांचा अपमान केला म्हणून नारायण राणें यांना ते सहन झाले नाही व त्यांनी हे आगोदर श्री धुरी व त्यांच्या शिवसेनेने समजून घ्यावे असेही शेवटी नाडकर्णी व म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.









