नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
योगगुरु बाबा रामदेव यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएनकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. आयएमएच्या उत्तराखंड शाखेनं योगगुरु बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.
या नोटीसमध्ये आयएमए उत्तराखंडने म्हटले आहे की, जर योगगुरू बाबा रामदेव येणऱ्या १५ दिवसांत लिखित स्वरुपात माफी मागत नाहीत आणि वादग्रस्त केलेल्या वक्तव्याविरोधात व्हिडिओ पोस्ट करत नाही, तर त्यांनी १ हजार कोटींची भरपाई द्यावी.
आयएमए उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव यांच्याकडे ठोस ज्ञान नाही आहे. मी बाबा रामदेव यांच्याशी आमने-सामने करण्यास तयार आहे. रामदेव यांना अॅलोपॅथीच्या संदर्भात जास्त माहिती नाही आहे, असे असूनही ते अॅलोपॅथी आणि या संबंधित डॉक्टरांच्या विरोधात आहे. ते फक्त वक्तव्य करतात. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत रात्रंदिवस काम करणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण झाले आहे. बाबा रामदेव सतत आपली औषधं विकण्यासाठी खोटं बोलत आहे, असा खन्ना यांनी दावा केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अॅलोपॅथीविषयी केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









