ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ॲलोपॅथीवरील वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात दाखल झालेल्या एफआयआरचा सामना करणाऱ्या बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ॲलोपॅथीवरील वक्तव्यावरून देशाच्या विविध भागात दाखल केलेल्या एफआयआरची एकाच ठिकाणी नोंदणी करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पाटणा आणि रायपूर शाखेने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मागितले आहे.