ऑनलाइन टीम / मुंबई :
मुंबईतील दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फूटांनी वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची उंची 250 फूट निश्चित करण्यात आली होती. आता ती वाढवून साडे 350 फूट होणार आहे. तर चबुतऱयाची उंची ही 100 फूट कायम असणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहीलेल्या सर्व परवानग्या आठ दिवसांत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्मारकात चवदार तळ्याची प्रतिकृती उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उंची वाढवल्यामुळे पुतळय़ाचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी 709 कोटींचा खर्च आता 990 कोटींवर जाणार आहे.









