ऑनलाईन टीम / नवी लखनऊ :
अयोध्येत 6 डिसेंबर 1992 मध्ये झालेल्या बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी न्यायाधीश एस. के. यादव यांचे विशेष सीबीआय न्यायालय उद्या (दि.30) निकाल देणार आहे. उद्या न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात आरोपी असलेल्या 32 जणांनी आपले जबाब नोंदवले आहेत. या खटल्याची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली असून, उद्या पुढील सुनावणी होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, साध्वी रिटब्रा, राज्यसभेचे माजी खासदार विनय कटियार यांच्यासह एकूण 49 जणांचा या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये समावेश आहे. त्यामधील 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
आयपीसीच्या कलम 153 अ, 153 ब, 505, 147 आणि 149 अंतर्गत हे प्रकरण रायबरेलीकडे गेले. त्यानंतर लखनऊ सीबीआय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.









