प्रतिनिधी / सांगली
बाबरी प्रकरणी भाजप व इतर पक्षातील वरीष्ठ नेत्यांना आरोपी केले होते. त्या प्रकरणाच्या निकालाची गेल्या २८ वर्षांपासून प्रतीक्षा होती. आज CBI कोर्टाने निर्णय देताना मा. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या निर्णया नंतर लगेचच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पेढे वाटून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह, युवा मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक धीरज सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Article‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर
Next Article लालबहाद्दुर शास्रीनगर येथील रहिवासी बेपत्ता








