मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत. एका ट्वीटर युझरचा बाप काढणे, महापौरांच्या अंगाशी आले आहे. पण यासंदर्भात आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. बाप काढल्याचे ते ट्वीट एका शिवसैनिकाकडून चुकून टाकले गेले. पण हे चुकीचे ट्वीट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी केली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
माध्यमांशी संवाद साधतान किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं.ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण तसं वागू नये या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं. तसंच त्या मुलाला परत माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं. तसेच त्या म्हणाल्या की, कोणी किती जवळचा असला तर त्याच्याकडे मोबाइल देऊ नये हा धडाच यानिमित्ताने मला मिळाला आहे. आज ट्विट केलं आहे, उद्या काहीही होऊ शकतं, अशी भीती देखील किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.
नेमके काय ट्वीट होते, ज्यामुळे किशोरी पेडणेकर ट्रोल झाल्या?
महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्वीटरवर अकाउंटवर शेअर केली होती. यामध्ये मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्यांच्या प्रतिसाद मिळाल्याची माहिती त्यांनी दिली होती. या ट्वीटरला एका युझरने कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचे कंत्राट दिले असा प्रश्न विचारला. यावर किशोरी पेडणेकर यांच्या अकाउंटवरून ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर दिले गेले. त्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








