प्रतिनिधी/ बेळगाव
64 कलांचा अधिपती, विद्येचा अधि÷ाता, विघ्नहर्ता अशा अनेक रुपांनी भक्तांवर आपला वरदहस्त ठेवणाऱया गणरायांचे आज शनिवारी आगमन होत आहे. ‘बाप्पा तुम्ही यावे आणि कोरोनाला माघारी धाडावे’ अशी इच्छा मनोमनी बाळगत शहरवासीय गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. उत्सव आहे त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होणारच. परंतु आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना अद्यापही गेलेला नाही. त्यामुळे कोविड 19 साठीच्या सर्व नियमांचे पालन आजही तितक्मयाच काटेकोरपणे होण्याची गरज आहे. मात्र सध्या खरेदीच्या उत्साहामध्ये नागरिकांनी सावध राहणे आणि प्रशासनाने नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गणेशात्सव हा अनेक हातांना काम देणारा उत्सव आहे. राबणाऱया प्रत्येक हाताना या उत्सवाच्या दरम्यान पैसे मिळतात. लॉकडाऊनमुळे जी आर्थिक घडी विस्कटली ती या उत्सवाच्या निमित्ताने थोडीतरी बसविता येते का या हेतूने विपेते बाजारपेठेत विविध साहित्य घेऊन सज्ज झाले आहेत.
घरगुती गणेशोत्सवासाठी लहान मखर
बाजारपेठेत विविध स्वरुपाचे मखर आले आहेत. थर्मोकॉलच्या या मखरामध्ये अनेक विविध नमुने असून यंदा घरगुती गणेशोत्सवासाठी लहान मखरांची संख्या अधिक दिसते आहे. गणेशाला बसण्यासाठीचे चौरंग, मागे लावण्यासाठी चक्र, गणपती बाप्पा मोरयाचे कागदी माळा, झिरमिळय़ा, सजावटीचे चेंडू, विद्युत रोषणाई करण्यासाठीच्या विद्युत माळा, विविध प्रकारचे लहान-मोठय़ा आकारातील पडदे, तोरण, प्लास्टिकच्या फुलांची तोरणे, पुष्पगुच्छ असे एक ना अनेक तऱहेचे सजावटीचे साहित्य बाजारात आले आहे.
रांगोळीचे रंग खरेदी करण्यावर महिलावर्गाचा भर
उत्सवासाठी रांगोळी महत्त्वाची, त्यामुळे सर्वत्र विविध प्रकारचे रंग घेऊन विपेते सज्ज आहेत. परंतु पावसाने त्यांचा काहीसा हिरमोड केला आहे. एरवी रस्त्यावर विविध प्रकारच्या रांगोळय़ा रेखाटून ही मंडळी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असतात. अर्थात जेथे शक्मय आहे तेथे रांगोळय़ाच्या छापातून ते प्रात्यक्षिकही दाखवत आहेत. रांगोळी आणि रांगोळीचे रंग खरेदी करण्यावर महिला वर्गाचा भर अधिक आहे.
पूजा साहित्यही दाखल
बाजारपेठेत पूजा साहित्यही दाखल झाले आहेत. कापसाच्या वाती, फुलवाती, माळा वस्त्र, कापसापासून बनविलेले हार, याशिवाय हळदीकुंकू, अक्षता, शेंदूर, बुका, अष्टगंध, उदबत्ती, कापूर, अत्तर, जानवे, हे साहित्य उपलब्ध आहे. याशिवाय श्रीफळांची म्हणजे नाराळाची आवकही वाढली आहे.
उत्सवाच्या निमित्ताने बऱयाच घरांमध्ये खदखद हा पदार्थ आवर्जुन केला जातो. यासाठी प्रामुख्याने सोळा भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत भाज्यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजीमंडईला बहर आला आहे.
फळांना मागणी वाढली
श्रीमूर्तीसमोर पाच फळे ठेवण्याचा प्रघात आहे. उत्सवाच्या प्रारंभापासून समाप्तीपर्यंत श्रीमूर्तीसमोर केळी ठेवण्याची ही पद्धत आहे. त्यामुळे प्रामुख्याने कच्च्या केळय़ांची आवक वाढली आहे. 50 ते 80 रुपये असा त्याचा डझनाचा दर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फळ विपेते दिसत आहेत. आकारमानानुसार त्याचा दर असून लहान आकारातील पाच फळांचा दर 50 ते 60 रुपये आहे व मोठय़ा आकारातील फळाचा दर 100 रुपये आहे. माटोळी घेऊन शुक्रवारी सकाळीच विपेते दाखल झाले आहेत.
उत्सव आणि फुले हे समीकरणच असल्याने गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, येथे फुल विपेत्यांची संख्या वाढली आहे. शेवंती, ऑस्टर, डेलिया, कमळ, झेंडू, गुलाब, चमेली, याबरोबरच केवडा सुद्धा आला आहे. इतर फुलांच्या तुलनेत केवडा 75 ते 100 रुपयापर्यंत मिळतो आहे.
बाजारपेठेत गौरीचे मुखवटेही उपलब्ध
गणरायापाठोपाठ गौरीचेही आगमन होणार असल्याने बाजारपेठेत गौरीचे मुखवटेही उपलब्ध आहेत. शुक्रवारी हरितालिकेचे व्रत करणाऱया महिलांनी बाजारपेठेत येऊन गौरीचे मुखवटे खरेदी केले. काही हौशी मंडळीनी चांदीचा मुखवटा घेण्याचेही पसंत केले. सालाबादप्रमाणे सराफी पेढीवर उत्सवासाठी चांदीच्या श्रीमूर्तीबरोबरच चांदीचे जास्वंदीचे फूल, विडय़ाचे पान, दुर्वांचा हार, जानवे, चांदीचे नाणे असे दागिने उपलब्ध आहेत.
विविध प्रकारच्या मोदकांना मागणी
लॉकडाऊनमध्ये मिठाईची दुकानेही काही दिवस बंद होती. त्यामुळे त्यांचेही आर्थिक नुकसान झालेच होते. उत्सवाच्या निमित्ताने प्रसादाच्या स्वरुपात पेढे, मोदक, बर्फी दिली जात असल्याने मिठाई दुकानदारांनी सर्व मिठाई तयार करून ठेवली आहे. विविध प्रकारच्या मोदकांना मागणी आहे.
उत्सवाच्यानिमित्ताने पुरोहित वर्गालाही मागणी वाढली आहे. यंदा सर्वच मंडळाने उत्सव साधेपणाने करण्याचे ठरविल्याने त्यांची धावपळ कमी होणार आहे. अर्थात घरगुती पूजेसाठी त्यांचे बुकिंग झालेले आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज
उत्सवाचे पावित्र्य आणि महत्त्व हे नेहमीच अबाधित आहेत. मात्र यंदा उत्सव आणि खबरदारी किंवा दक्षता असे समीकरण करणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील गर्दी, ही ताण वाढविणारी ठरते आहे. त्यातही बहुसंख्य मंडळी आजही मास्क घालण्याबाबत दुर्लक्ष करीत आहेत. मास्क न वापरणाऱयांना प्रवेश नाही, असा नियम सर्वच विपेत्यांनी करणे भाग आहे. आणि जे विपेते मास्क घालत नाही. त्यांच्याकडे खरेदी करायची नाही, असा नियम नागरिकांनी करायला हवा. प्रत्येक वस्तू सर्वत्र मिळत आहेत. त्यामुळे गर्दी करून आरोग्य धोक्मयात टाकण्याऐवजी कमी गर्दीच्या ठिकाणी खरेदी करण्यावर नागरिकांनी भर देणे आवश्यक आहे.









