प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून बाधित वाढ कमी होवू लागल्याचा दिलासा आहे. लक्षणे असलेल्यांची स्वॅब तपासणी केली जात असून शनिवारी दिवसभरात 2758 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. रविवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिह्यात नव्याने बाधित 292 जण आढळून आले असून जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 10.59 वर आलेला आहे. कोरोनामुक्तीचा दर वाढलेला आहे. जानेवारी महिन्यात कैलास स्मशानभूमीत केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 52 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जानेवारीमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या 52 जणांवर अंत्यसंस्कार
येथील संगमाहुली येथील कैलास स्मशानभूमीत कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. जानेवारी 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 53 जणांवर तर 132 जण अन्य कारणाने मृत्यू झालेले असे 185 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर जानेवारी 2022 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 52 जणांवर तर इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या 148 अशा 200 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूदर जिह्याचा कमीच आहे. तो रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे.
बाधितवाढ होवू लागली कमी
नव्याने बाधित वाढ आढळून येत असलेल्यांची संख्या फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून कमी होत राहिली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये 2471 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. तर दि. 6 रोजी जाहीर झालेल्या अहवालात 292 जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिह्यातील 2 लाख 77 हजार 992 एवढी झालेली आहे. तर कोरोनामुक्तीचाही दर वाढलेला असून कोरोनामुक्तीही बाधित आढळून येणाऱयांपेक्षा जास्त असून जिह्यासाठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, जिह्यातील सगळय़ात कमी बाधित हे महाबळेश्वर तालुक्यात आढळून येत आहेत. त्यापाठोपाठ जावली, पाटण, वाई या तालुक्यांचा समावेश होतो. तर सगळयात जास्त बाधित वाढ ही सातारा तालुक्यात आढळून येत आहेत. सातारापाठोपाठ कराड, फलटणचा क्रमांक लागतो.
नव्याने बाधितांमध्ये तीन तालुके दहाच्या आत
तालुकानिहाय नव्याने बाधित आढळून येण्याची संख्या कमी होवू लागली आहे. कंसात मृत्यू झालेली पुढीलप्रमाणे- जावली 8(0), कराड 59(1), खंडाळा 14(0), खटाव 20(1), कोरेगाव 21(1), माण 24(0), महाबळेश्वर 2(0), पाटण 7(3), फलटण 29(0), सातारा 73(5), वाई 18(0), इतर 13(1), एकुण 288(12).
रविवारी
नमूने- 2758
बाधित-292
मृत्यू-11
सक्रीय रुग्ण-2661
मुक्त-733
रविवारपर्यंत
नमूने-25,14,999
बाधित-277993
मृत्यू-6629
मुक्त-267412









