अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 31 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● पॉझिटिव्हीटी 21.95 वर
● तपासण्या 2556
● कोरोनामुक्तीचा वेग वाढला
● हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे सव्वा चारशेच्या आसपास
सातारा / प्रतिनिधी :
जानेवारी महिन्यात जिल्हावासींयांना कोरोना बाधित वाढ ही चढत्या क्रमाने बाधित वाढ होताना पहायला मिळत होती. तसे असले तरी बाधित आढळून येणारे ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत. त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या सुमारे साडेचारशेच्या आसपास आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी बाधित वाढ निम्म्याने कमी झाली आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालानुसार 561 जण नव्याने बाधित आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 21.95 वर आला आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे मोजकेच
कोरोनामुक्ती वाढलेली आहे. घरच्या घरीच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या चांगली वाढत आहे. सक्रिय रुग्णामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे हे सुमारे साडे चारशेच्या आसपास आढळून येत आहेत. त्यामध्ये गंभीर रुग्ण हे 20 च्या आसपास आढळून येत आहेत. एकूणच हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे मोजकेच आहेत.
नव्याने बाधित सर्वात कमी महाबळेश्वर तालुक्यात
बाधित वाढ ही कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जावली 12, कराड 100, खंडाळा 37, खटाव 46, कोरेगाव 43, माण 34, महाबळेश्वर 4, पाटण 12, सातारा 167, वाई 15 असे नव्याने बाधित आढळून आले आहेत.
सोमवारी
नमुने-2556
बाधित-561
सोमवारपर्यंत
नमुने-24,99,943
बाधित-2,76,047
मृत्यू-6,574
मुक्त-2,59,806