अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 1 जून 2021, स.11.00
● रतीब कमी : 1,667 बाधित ● आकड्यांचा घोळ अद्यापही सुरूच ● पॉझिटिव्हिटी दर 14.70 टक्के ● नवीन लॉकडाऊनची सुरुवात घटीने ● कोरोनामुक्तांची संख्या दिलासा देते ● लॉकडाऊन माथी मारल्याची भावना
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण एप्रिल महिना जिल्हावासियांनी कोरोना संसर्गाच्या भीतीच्या छायेखाली काढला. लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन असे करत असतानाच दुसरीकडे दररोज दोन हजाराच्या पटीत वाढत असलेली रुग्णांची संख्या आणि बळींची संख्या अंगावर काटा आणत होती. मात्र गेल्या मृत्यूदरात होत असलेली घट आणि बाधित वाढीचा घसरता आलेख दिलासा देव पाहतोय त्यातच पुन्हा आठ दिवसाचा कडक लॉकडाऊन जिल्ह्यावर लादला गेला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी बाधित वाढीचा आलेख थोडा खाली आला असून सोमवारी रात्रीच्या अहवालात 1,667 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
आकडेवारीचा घोळ अद्यापही सुरूच
गेल्या काही दिवसात प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीत तपासण्यांच्या संख्या मर्यादेपेक्षा जास्त येत आहेत त्यामुळे सध्या पॉझिटिव्हिटी रेट खाली दिसत असला तरी दोन हजारांच्या पटीत बाधित वाढ सुरू होती. कडक लॉकडाऊन केल्यानंतरही या स्थितीत फरक पडलेला नव्हता. शेवटी गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्ह्यातील चिंताजनक परिस्थिती पाहून रात्री उशिरा येऊन आढावा घेतला. हा आढावा घेताना अजित दादा पवार यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला चांगलेच खडसावले. मात्र लोकप्रतिनिधींना झाकत प्रशासनावर ताशेरे ओढले तरी परिस्थिती बदललेली नाही. आकडेवारीचा घोळ सुरूच असून त्यामध्ये पारदर्शकता आणण्याची गरज आहे.
पुढील दिवसात तरी कहर कमी व्हावा
सातारा जिल्ह्याची स्थिती किती चिंताजनक आहे हे आकडेवारीवरून समजत आहे. मात्र निगेटिव्ह अहवालांचा पेंडिंग डाटा भरण्यात आल्याने असे घडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के एवढा होता. त्यानंतर तो मे महिन्यात 34 टक्केवर आलेला आहे. सध्या तो 27 टक्के असून पॉझिटिव्हिटी रेट खाली घसरत असला तरी बाधित वाढ कायम होता. मात्र गेले दोन दिवस त्यात होत असलेली घट दिलासादायक असून यामध्ये कोरोना मुक्तीचा वाढता रेटही दिलासादायक आहे हे निश्चितच.
लॉकडाऊनचा भार जिल्हावासियांवर
आठ दिवस कडक लॉकडाउन केल्यानंतरही जिल्ह्याच्या स्थितीस फारसा फरक पडला नव्हता. आता पुढे काय हाच प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे आणि होता. पुण्या-मुंबईत कोरोना संसर्ग कमी होत असताना सातारा जिल्ह्यात मात्र तो थांबतच नव्हता. शेवटी आकडेवारीच्या खेळानंतर प्रशासनाने आणखी आठ दिवसाचा लॉकडाउन जनतेच्या माथी मारला आहे अशीच सातारकरांची भावना आहे.
सोमवारी अहवालात 1,667 बाधित
सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 1,667 जणांचा अहवाल बाधित आलेला असून यामध्ये 11, 339 जणांची टेस्ट करण्यात आली असून पैकी 1,667 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये 8,588 आठ जणांची ऑंटीजन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 1,034 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्याचा दर 12.04 असा आहे. तर 2,751 जणांची rt-pcr टेस्ट केल्यानंतर 633 जणांचा अहवाल बाधित आलेला असून rt-pcr टेस्ट चा पॉझिटिव्हिटी दर 23.01 असा आहे. गेली दोन दिवस मृत्यूचा आकडा 30 वर स्थिर राहिलेला आहे. मात्र तो थांबलेला नाही या एकूण परिस्थितीत जिल्ह्याला दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 7,88,834 एकूण बाधित – 1,66,256 एकूण कोरोनामुक्त 1,41,170 मृत्यू -3,677 उपचारार्थ रुग्ण-21,412
सोमवारपर्यंत जिल्हय़ात बाधित 1,872मुक्त 2,369बळी 35









