दिवसभरात 38 जणांचा मृत्यू : 1401 नवीन रुग्ण,2362 झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
कोरोनामुळे गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी 38 जणांचे बळी गेले असून 1401 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत तर 2362 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरातील 38 बळीपैकी 25 जणांचा मृत्यू गोमेकॉत झाला. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 8 जणांनी प्राण सोडला. उत्तर गोव्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दोघांचा अंत झाला. दक्षिण गोव्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दोघांचे निधन झाले. मृतांपैकी चार जणांनी प्रथम कोरोना प्रतिबंधक डोस घेतला होता, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
कालच्या 38 बळींमुळे वर्षभरातील एकूण मृतांचा आकडा 2421 झाला आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत मिळून एकूण 147861 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 129162 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल सोमवारी 162 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून 1236 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 16278 एवढी असून 147 जणांना हॉस्पिटलातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.35 टक्के असून पॉझिटिव्ह होण्याचा दर 35 टक्क्याच्या आसपास आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱयांची संख्या वाढत आहे ही एक गोष्ट दिलासा देणारी आहे. विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णसंख्या ः डिचोली – 402, सांखळी – 484, पेडणे – 556, वाळपई – 360, म्हापसा – 429, पणजी – 883, हळदोणा – 326, बेतकी – 590, कांदोळी – 749, कासारवर्णे – 135, कोलवाळ – 291, खोर्ली – 475, चिंबल – 826, शिवोली – 593, पर्वरी – 761, मये – 132, कुडचडे – 544, काणकोण – 276, मडगांव – 1588, वास्को – 514, बाळ्ळी – 293, कासांवली – 667, चिंचिणी – 199, कुठ्ठाळी – 642, कुडतरी – 484, लोटली – 494, मडकई – 243, केपे – 334, सांगे – 227, शिरोडा – 304, धारबांदोडा – 303, फोंडा – 871, नावेली – 301. विविध आरोग्य केंद्रातील रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत असली तरी मृत्यूची आकडेवारी मात्र कमी होत नसल्याने भीती कायम आहे.









