प्रतिनिधी / पणजी
कोरोनामुळे काल सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला तर एकूण बळी 511 वर पोहचले आहेत. नवीन रुग्ण 308 सापडले असून 495 जण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 4465 एवढी झाली असून त्यांच्यावर विविध हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये उपचार चालू आहेत.
आतापर्यंतचे मिळून एकूण रुग्ण 38674 वर पोहचले असून त्यातील 33698 बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. संशयित रुग्ण म्हणून 67 जणांना गेमेकॉत आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून 262 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
पणजी शहरात रविवारी 11 ऑक्टोबर रोजी 18 तर सोमवारी 16 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. सध्या रुग्ण आहेत त्याच ठिकाणी हे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली 135, सांखळी 230, पेडणे 129, वाळपई 112, म्हापसा 241, पणजी 167, हळदोणा 105, बेतकी 72, कांदोळी 221, कासारवर्णे 63, कोलवाळ 107, खोर्ली 128, चिंबल 281, शिवोली 144, पर्वरी 306, मये 35, कुडचडे 109, काणकोण 122, मडगाव 313, वास्को 227, बाळ्ळी 69, कासावली 98, चिंचणी 32, कुठ्ठाळी 164, कुडतरी 76, लोटली 64, मडकई 67, केपे 109, सांगे 96, शिरोडा 40, धारबांदोडा 76, फोंडा 251, नावेली 75. गोव्यात आलेल्या एका प्रवाशाला कोविडची बाधा झाली आहे.
12 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण रुग्ण 38674
12 ऑक्टोबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 33698
12 ऑक्टोबरपर्यंतचे सक्रिय रुग्ण 4465
12 ऑक्टोबरचे नवे रुग्ण 308
12 ऑक्टोबरचे बरे झालेले रुग्ण 495
12 ऑक्टोबरचे बळी 4
आतापर्यंतचे एकूण बळी 511
कोरोना मृत्यू दर घटविण्यासाठी प्रयत्न : पन्नास वर्षांवरील लोकांवर लक्ष देणार
प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारी आणि इतर आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी खास मोहीम राबवण्याची तयारी आरोग्य खात्याने केली असून 50 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे.
कोरोनाच्या फेरआढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. गावागावात जाऊन 50 वर्षांवरील माणसे शोधून काढण्यात येणार असून त्यांना कोणते आजार आहेत, याची माहिती मिळवून त्यानुसार त्यांची काळजी घेण्याचा आरोग्य खात्याचा इरादा असल्याचे राणे यांनी नमूद केले.
गावातील तसेच शहरातील आरोग्य केंद्रांना या कामात सहभागी करुन घेण्यात येणार असून गरज पडली तर अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन 50 वर्षांपवरील कोरोना रुग्णांची माहिती काढली जाणार आहे. त्या सर्व रुग्णांपर्यंत मेडिकल सुविधा – किट पोहोचविण्यात येणार आहे. रुग्ण पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह त्यांच्या छातीचा एक्स रे काढून तपासणी करुन योग्य ते उपचार देण्याचे काम करण्यात येणार आहे. अनेक रुग्ण शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यांना वाचवणे शक्य होत नाही. अनेकजण हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाहीत. अनेकांची नोंद नसते, अशा सर्वांच्या घराकडे जाऊन उपचार करण्याचा प्रयत्न त्या मोहिमेतून करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.









