अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 12 सप्टें. 2021 स. 11.00
● दिलासा सुद्धा हिंदोळे देऊनच
● शनिवारी अहवालात 419 बाधित
● एकूण 11,274 जणांची तपासणी
● आकडेवारीतील तफावत मिटवा
● सकाळचे 202, सायंकाळी अहवालात 193
● बाधित वाढ तीनशे-चारशे वर स्थिर
सातारा / प्रतिनिधी :
‘गफलतींचा खेळ सारा, नागरिकांच्या जिवाला घोर सारा’… अशीच काही अवस्था सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची झाली आहे. मुंबईसारख्या कार्पोरेट सिटीमध्ये कोरोना आटोक्यात आलाय मात्र सातारा जिल्ह्यातील कोरोना काही लवकर ऐकत नाही. तो मुंबईची बरोबरी करत वाटचाल करत आहे. कधी तपासणी जास्त, कधी कमी तसे हिंदोळे देत प्रशासनाकडून कोरोना स्थितीवर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शुक्रवारी रात्रीच्या या अहवालाने बाधित वाढ 200 च्या खाली घसरल्याचा दिलासा दिला होता. मात्र परत शनिवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा परिस्थिती जैसे थे असून बाधित वाढ चारशेच्या वरच राहिलेली आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाढ मंदावलेली आहे मात्र की तीनशे चारशे वर स्थिर आहे हे चित्र कधी बदलणार हा सवाल नागरिकांच्या मनात आहे.
शनिवारी रात्री 419 बाधित
शनिवारी रात्रीच्या अहवालानुसार एकूण 11,274 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे आहे. यामध्ये एकूण एवढ्या 419 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. सप्टेंबर महिन्याचा आरंभ आणि गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यापासून घटत असलेली बाधित वाढ दिलासादायक आहे. मात्र ती अद्याप तीनशे-चारशे वर स्थिर राहत असल्याने हे अजुन किती दिवस चालणार आहे यातून कधी सुटका होणार असेच भावना प्रत्येक प्रत्येकाच्या मनात आहे.
सकाळचे 202, सायंकाळी 193
प्रशासनाकडून सध्या देण्यात येत असलेल्या बाधितांच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे. रात्रीचा अहवाल सकाळी देण्यात येतो त्यावेळी बाधितांची आकडेवारी पुढे असते आणि सायंकाळी सविस्तर अहवालात ती कमी होते. शुक्रवारी रात्री च्या अहवालात देखील सकाळी 202 बाधित आल्याची नोंद आहे हे मात्र त्याचा सविस्तर अहवाल येताना बाधितांची आकडेवारी 193 दाखवण्यात आलेली आहे. चे जे 9 बाधित कमी झाले ते चांगलेच आहे पण आकडेवारीत अचुकता हवी हीच नागरिकांची अपेक्षाा आहे. आता शनिवारी रात्रीचा अहवाल रविवारी सायंकाळी सविस्तर देण्यात येईल. त्यामध्ये 419 बाधितां ची संख्या आहे ते कमी झाली तर नेमके कमी होणारे बाकी यादीतून गायब होतात कसे? ती कमी कसे होतात याचा एक खुलासा आरोग्य विभाग व प्रशासनाने केला पाहिजे.
आकडेवारीतील तफावती मिटवा
जिल्ह्याची एकूण बाधितांचे संख्या एकूण मुक्त झालेल्यांची संख्या आणि उपचारार्थ रुग्णांची संख्या यामध्ये गेल्या काही दिवसापासून आकडेवारी चुकत आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर नागरिक त्याचा हिशोब मांडत आहेत. ही आकडेवारी व्यवस्थित करा असे सांगत आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेले आहे. मधूनच कोरोना मुक्ती चा आकडा उसळी मारतो आणि पुन्हा आठवडाभर तो शंभर, दोनशे, तीनशे वर येतो. एकीकडे बाधित वाढ कमी होत असताना कोरोना मुक्तीही का कमी होते. उपचारार्थथ रुग्ण नऊ हजारांच्या खाली का येत नाही? असाही नागरिकांच्या मनातील सवाल आहे.
शनिवारी जिल्ह्यात
बाधित-193
मृत- 3
मुक्त-236
शनिवरपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने 19,11,168
एकूण बाधित 2,44094
घरी सोडण्यात आलेले 2,31,964
मृत्यू -6,017
उपचारार्थ रुग्ण 9,055









