अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 5 सप्टें. 2021, स. 11.20
● शनिवारी अहवालात 540 बाधित
● एकूण 10,309 जणांची तपासणी
● उपचारार्थ रुग्ण दहा हजारांवर
● शुक्रवारी वाढ चारशेच्या खाली
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबरचा आरंभ जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत आहे. चार-पाच दिवसात बाधित वाढ पाचशेवर स्थिर आहे. ती थोडीफार खालीवर होत असतानाच शुक्रवारी गत तीन महिन्यातून बाधित वाढ चारशेच्या खाली घसरल्याचा मोठा दिलासा लाभला होता. शुक्रवारी 351 जणांचे अहवाल बाधित आले होते. त्यामुळे हा मंदावलेला वेग आता शनिवारीच्या अहवालात तो आणखी खाली जाईल असे वाटत असताना पुन्हा वाढ 500 वर स्थिर राहिली असून, शनिवारी रात्रीच्या अहवालात 540 जणांचा अहवाल बाधित आला आहे.
शुक्रवारी अहवालाचा मोठा दिलासा
शुक्रवार रात्री प्रशासनाकडून आलेल्या आलेल्या अहवालाने मोठा दिलासा दिला. कारण गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेली तीन अंकी बाधित वाढ आताही तशी सुरू असली तरी तब्बल तीन ते चार महिन्यांनी बाधीत वाढ चारशेच्या खाली घसरली होती. 351 जणांचा अहवाल बाधित होता तर या अहवालात एका सुद्धा मृत्यूची नोंद नव्हती. मृत्यूची नोंद नसण्याचा हा देखील गत तीन चार महिन्यातील पहिलाच दिवस होता.
शनिवारी पुन्हा 540 बाधित
शनिवारी रात्री प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार एकूण 10,309 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 540 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. मात्र तरीही बाधीत वाढ मंदावत असल्याचा यामध्ये दिलासा असला तरी वाढ थांबत नाही. जशी मृत्यूची आकडेवारी शून्यावर आली तसेच कोरोना बाधितांचे आकडेही कधी तरी शून्यावर यावेत अशीच जिल्हावासियांच्या मनातील अपेक्षा आहे.
जगरहाटीला आली बेशिस्त
सप्टेंबर महिन्याचा आरंभ पाठवा बागेत वाढीचा वेग मंदावताना दिसत असला तरी यामध्ये सध्या अनलॉक करण्यात आल्याने जगरहाटीला गती आली आहे. बाजारपेठेत गर्दी असणं हे स्वाभाविक असले तरी अद्यापही काही महिने मास्क सोशल डिस्टन्स पाळण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र काही नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे. मात्र तरीदेखील नागरिकांनी मास्क, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी हे निश्चित.
शनिवारी जिल्ह्यात
बाधित 351
डिस्चार्ज 164
मृत्यू 00
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने 18,36,016
एकूण बाधित 2,41,458
घरी सोडलेले- 2,28,276
मृत्यू 6,059
उपचारार्थ रुग्ण 10,536