प्रतिनिधी/ मडगांव
पोलीस अटक करीत असले तरी गोव्यात चरस, अफ। गांजा या अमलीपदार्थाचा व्यापार करणाऱयांचा आकडा दिवसेनदिवस वाढत असून बाणावली येथे धाड घालून पोलिसांनी बुदावारी अशाच एका व्यापाऱयाला अटक केली.
कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड घालण्यात आली आणि मांडप -नावेली येथील आरोपी साहील राजाभोली (20) या आरोपीला बाणावली येथे अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्याची झडटी घेतली तेव्हा या आरोपीकडे 140 ग्रॅम गांजासदृश्य पदार्थ सापडला. या पदार्थाची बाजारातील किंमत अंदाजे 14 हजार इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









