मुंबई
पादत्राणांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया बाटा इंडियाने डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 72 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याच तिमाहीत 841 कोटी रुपयांच्या पादत्राणांची विक्री केली असल्याचेही बाटा इंडियाने सांगितले आहे. कंपनीने डिसेंबर 21 च्या तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत (26 कोटी रुपये) 173 टक्के वाढीव नफा नोंदवलाय.









