ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी दिल्लीतील साकेत न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आरिझ खानला दोषी ठरवले आहे. त्याच्या शिक्षेचा निर्णय 15 मार्चला होणार आहे.
2008 मध्ये बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये शहीद झालेले इन्स्पेक्टर मोहन शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला दोषी ठरवले होते. मात्र, तेव्हापासून तो फरार होता. 2018 मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307 अंतर्गत दोषी ठरवले आहे.
पोलीस कर्मचारी बलवंतसिंग-राजवीर यालाही ठार मारण्याचा प्रयत्न आरिझने केला होता.