गाडी ही न वापरण्याचा प्रशासक मंडळाचा निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक मंडळ नियुक्त झाल्यानंतर काटकसरीचा कारवाई सुरू झालेला आहे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार व आदरातिथ्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बाजार समिती कडील गाड्या वापरणार नाही एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासक मंडळाने घेतलेली महत्त्वपूर्ण निर्णय असे
शिरोळ तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संवाद साधून हा ताजा भाजीपाला कोल्हापूर बाजार समितीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्या साठी प्रयत्न करणे
कागल येथील उपबाजारात परिसरासह सीमाभागातील भाजीपाला कडधान्य व अन्य शेतीमाल विक्रीसाठी कसा येईल यावर्षी प्रयत्न करणे
जनावर बाजार सर्व सोयींनी युक्त भरवणे. जनावर विक्रीसाठी यावीत प्रयत्न करणे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले प्रशासक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती सचिव मोहन सालपे यांनी दिली.