सेन्सेक्स 1,736 अंकांची मजबूत : बजाज फायनान्स, स्टेट बँक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी दहा महिन्यांची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती, परंतु दुसऱया सत्रात मंगळवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या मजबूत लिलावाच्या कारणास्तव सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नुकसान भरपाई भरुन काढल्याचे दिसून आले आहे. मंगळवारच्या सत्रात अंतिमक्षणी सेन्सेक्स 1,700 पेक्षा अधिक अंकांनी वधारला आहे. याच दरम्यान निफ्टीनेही पुन्हा 17,000 अंकांचा टप्पा प्राप्त केला होता.
बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागातील सेन्सेक्स दिवसअखेर 1,736.21 अंकांनी वधारत 58,142.05 अंकांवर बंद झाला आहे. याच दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 509.65 अंकांनी वधारुन 17,352.45 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 कंपन्यांचे समभाग वधारल्याने मुख्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि टायटन यांचे समभाग 5.13 टक्क्यांनी वधारले आहेत.
मागील दहा महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण बाजारात नेंदवली होती, परंतु मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सयंम ठेवल्याने प्रमुख क्षेत्रांपैकी वाहन, बँक, आयटी आणि एफएमसीजी यांचे समभाग बाजारात तेजीत राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये राहिलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा प्रभावाचा लाभ झाला आहे.
जागतिक पातळीवरील आशिया व अन्य बाजारातील स्थितीमध्ये युक्रेनवर रशिया याच्यात होणाऱया युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने बाजारात घसरणीचा कल राहिला होता. परंतु रशियाला अमेरिकेने हल्ला करु नका असा कडक इशारा दिला होता. याचा फायदा शेअर बाजारानी उचलला असल्याचे पहावायस मिळाले आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 2.44 टक्क्यांनी घसरुन 94.13 डॉलर प्रति बॅरेलवर आला होता. विदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याने शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार सोमवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 4,253.70 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली आहे.









