सेन्सेक्स 441 तर निफ्टी 142.76 नी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सलगच्या विक्रीतील प्रभावामुळे आणि अमेरिकेतील बॉण्ड बाजारातील दबावामुळे गुंतवणूकदार काळजीत राहिल्याचे दिसून आले याचा परिणाम आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात राहिल्याने सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 441 अंकांनी घसरला तर निफ्टी 15,000 अंकांच्या खाली जात बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर सेन्सेक्स 440.76 अंकांनी म्हणजे 0.87 टक्क्यांनी नुकसान नोंदवत निर्देशांक 50,405.32 वर बंद झाला आहे. दिवसभरातील ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स 726 अंकावर खालीवर स्थितीत राहिल्याचे दिसून आले. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142.65 अंकांनी प्रभावीत निर्देशांक 14,938.10 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज लॅब, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसनीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला ओएनजीसी, मारुती सुझुकी, कोटक बँक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीपैकी अमेरिकन बॉण्डवर प्राप्ती वाढल्याने दबावा वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे वॉल स्टीट्रमध्ये घसरण आली आहे. यांच्यासह अन्य आशियातील बाजारांमध्ये घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. दुसऱया बाजूला विविध बदलते राजकीय सामाजिक व आर्थिक कारणामुळे निवडक क्षेत्रांवर प्रभाव होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
शेअर बाजारातील अस्थायी आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिया गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात निव्वळ स्वरुपात 223.11 कोटी रुपये काढून घेतले आहेत. अंतरबँक विदेशी मुद्रा विनियम बाजारात रुपया 19 पैशानी घसरुन 73.02 प्रति डॉलरवर आला आहे. जागतिक बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 1.26 टक्क्यांच्या लाभासह 68.11 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.








