प्रतिनिधी /बेळगाव
नागपंचमीनंतर शहराला राखीपौर्णिमेचे वेध लागले. अर्थातच बाजारपेठेत विविधरंगी आणि बहुढंगी राख्या दाखल झाल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांवर राखी पौर्णिमा येवून ठेपली आहे. त्यामुळे सध्या बहिणी भावांसाठी राखी खरेदी करताना दिसून येत आहेत.
भारतीय संस्कृतीत राखीपौणिमा हा भावा-बहिणीच्या तरल नात्यांचा सण म्हणून मानला जातो. भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधायची आणि भावाने तिला तिच्या रक्षणाची ग्वाही द्यायची असा संकेत आहे. मात्र आता बहिणी सुद्धा सक्षम झाल्या असून प्रसंगी भावाच्या रक्षणार्थ त्यासुद्धा सिद्ध आहेत, अशी बदलती मानसिकताही दिसून येत आहे.
बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या आहेत. त्यामध्ये मोती, मणी, जरदोजीवर्क केलेल्या, केवळ गेंडय़ाच्या, कापडय़ाच्या, खणांच्या राख्या आल्या आहेत. शिवाय बालचमुला आकर्षित करतील अशा कार्टुनच्या म्हणजेच मोटू-पतलू, भीम आणि स्पाडरमॅन, पोकोमॅन, सिंघम या राख्या आल्या आहेत.
कोरोनामुळे आणि चाचण्यांच्या सक्तीमुळे बाहेर गावी असलेल्या भाऊरायांना बहिणीकडे राखी बांधून घेण्यासाठी येण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बहिणींनी राखी कुरिअर केली आहे. तथापि, शक्मयतो प्रत्यक्ष बहिणीकडून राखी बांधून घेतली जावी, यासाठी भाऊ प्रयत्नशील आहे. राख्यांच्या दरात फारशी वाढ झाली नाही. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून राख्या पाठविल्या गेल्याने स्थानिक विपेत्यांमध्ये नाराज आहे.
दरवषी इतका प्रतिसाद नाही : सचिन बाळेकुंद्री

राख्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. परंतु कोरोनाने आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. तऱहेतऱहेच्या राख्या असल्या तरी दरवषी इतका प्रतिसाद नाही. शिवाय ऑनलाईन राखी पाठविल्या गेल्याने आम्ही अडचणीत आलो आहोत. शहरवासियांनी शक्मयतो प्रत्यक्ष राखी खरेदी करावी. जेणेकरून स्थानिक विपेत्यांना प्रोत्साहन मिळेल.









