ऑनलाईन टीम / बागेश्वर :
बागेश्वरमध्ये सामान घेऊन येत असलेला एक ट्रक दरीत कोसळ्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 वाजता हा ट्रक (यूके 04 सीए 9520) पौडी बैंड जवळ दरीत कोसळला. ट्रकमध्ये दोन व्यक्ती होत्या. या अपघातात सागर कोरंगा यांचे पुत्र हयात सिंह कोरंगा (वय 22) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद सिंह यांचे पुत्र मोहन सिंह (वय 47) हे जखमी झाले आहेत.
जखमी झलेल्याला 108 च्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनेचा पंचनामा आणि पोस्ट मार्टेमची कारवाई सुरू केली आहे.









