ऑनलाईन टीम / बागेश्वर :
शुक्रवारी उत्तराखंडातील बागेश्वर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आज उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी उत्तरकाशी जिल्ह्यासह अन्य काही भागात भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
दरम्यान, यापूर्वी 1 डिसेंबर रोजी देखील उत्तराखंडातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. बहादराबाद ब्लॉकमधील औरंगाबाद भागातील डालूवाला काला गाव हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.









