प्रतिनिधी/ म्हसवड
बागलवाडी (विरळी)येथील पंचक्रोशी प्रतिष्ठानचे संस्थापक धुळा विष्णू गोरड व तेजस्विनी शिवाजी सुळ यांची कन्या तेजस्विनी यांचा विवाह धुळोबा गार्डन बागलवाडी येथे होणार होता ततपूर्वी लग्नाच्या आधी वर धुळा व वधू तेजस्वीनी यांच्या हस्ते व गोरड आणि सुळ परिवाराच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून एक नवीन आदर्श घालून दिला त्याबद्दल परिसरातून धुळा गोरड यांचे कौतुक आहे . सरपंच प्रशांत गोरड यांच्या पुढाकाराने साकार होत असलेल्या येथे धुळा गोरड आणि सर्व ग्रामस्थ यांनी वृक्षारोपण करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला . यावेळी विरळी ग्रामपंचायत सरपंच प्रशांत गोरड, उपसरपंच भारत आटपाडकर, रुक्मिणी बागल,युवा सागर,पडळकर, प्रदिपि गोरड, तुकाराम पडळकर,सागर गोरड, आर्जुन घुटगडेसह सदस्य आणि नागरिक उपस्थिती होती .









