वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ातील 102 ग्राम पंचायतीच्या दुसऱया टप्प्यातील मतदान 76.67 टक्के झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
बागलकोट तालुक्यात 82.45, हुनगुंद 78.14, बदामी 81.16, इलकल 75.20, गुळेदगुड्ड 81.39 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात जमखंडी उपविभागात 83.32 टक्के मतदान झाले होते. जिल्हय़ात दोन्ही मिळून सरासरी 81.50 टक्के मतदान झाले.
बागलकोट जिल्हय़ात 102 ग्राम पंचायतीकरिता दुसऱया टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले असले तरी कलादगी येथील एका केंद्रात दि. 29 रोजी फेर मतदान होणार आहे. बागलकोट तालुक्यातील कलादगी येथील वॉर्ड क्रमांक 11 मधील बुथ क्रमांक 51 मध्ये एका उमेदवारांचे निवडणूक चिन्ह चुकीचे पडल्याने येथे सकाळी 7.30 नंतर मतदान स्थगित करण्यात आले. आता या केंद्रात दि. 29 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत फेरमतदान होणार असल्याचे जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी सांगितले.
बागलकोट उपविभागातील बागलकोट, बदामी, गुळेदगुड्ड, इलकल, हुनगुंद या पाच तालुक्यातील 102 ग्राम पंचायतीच्या 1380 जागांकरिता दुसऱया टप्प्यात मतदान झाले. सकाळी 9 पर्यंत 6.71 टक्के, 11 पर्यंत 23.97 टक्के, दुपारी 1 पर्यंत 55.04 टक्के, दुपारी 3 पर्यंत 62.65 टक्के मतदान झाले होते. गुळेदगुड्ड, बदामी, हुनगुंद या तालुक्यात अनेक मतदान केंद्रावर महिलांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. मतदारांचे स्क्रिनिंग करण्यात येत होते.









