वार्ताहर /जमखंडी :
बागलकोट जिल्हय़ात गुरुवार दि. 6 रोजी आणखी 168 जणांना कोरोना बाधा झाली तर दोन बळी गेले व 34 रुग्ण संसर्गमुक्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण बाधित संख्या 2614 वर पोचली, तर बळींची संख्या 52 व बरे झालेल्यांची संख्या 1238 असून 1325 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
आज बाधितात हुनगुंद 51, जमखंडी 44, बागलकोट 36, मुधोळ 23, बदामी 10, बिळगी 4 असे एकूण 168 नवे रुग्ण दाखल झाले. अद्याप 228 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.
आतापर्यंत जिल्हय़ात 32656 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 29536 निगेटिव्ह, 2614 पॉझिटिव्ह अहवाला आला. बदामी येथील 65 वर्षाची महिला व बनहट्टी येथील 49 वर्षाचा पुरुष यांचा मृत्यू झाला. कोविड बाधित शव संस्काराच्या मार्गसूचनेप्रमाणे अंत्य संस्कार करण्यात आल्याचे डॉ. ए. एन. देसाई यांनी सांगितले.









