वार्ताहर / बांबवडे
बांबवडेत दारुच्या नशेत सिने स्टाईलने पोलिस चौकी समोरील इमारती वरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खुटाळवाडी येथील तरुणाने अखेर जीवन संपवले. गणेश यशवंत चव्हाण वय २५ याने दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.
गणेश याने दारुच्या नशेत बांबवडे पोलिस स्टेशनसमोरील इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुणांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला होता. मात्र, त्यानंतर दुपारी तो घरी जाऊन त्याने गावाजवळ असणाऱ्या तळ्यालगतच्या झाडाला गळफास घेतला.
दरम्यान, कुटुंबीय आणि शेजारच्या लोकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही लोक जागेवर पोहोचण्याआधीच त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई व विवाहीत बहीण आहे.
Previous Articleआगामी 3 महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री
Next Article साडेतीनशे महिलांना 55 लाखांची कोरोना मदत









