ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील 12 लाख 20 हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजारांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला आहे.लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद असून, मजुरांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत दिल्ली, गुजरात, कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश यासह पंधरा राज्यांनी बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली आहे.
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपये मदत म्हणून बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.









