प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील बसवेश्वर चौकात तिसऱ्या मजल्यावर गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या बाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सुतार यांच्या मजल्यावर नारायण रघुनाथ कोळी वय वर्ष 48 राहणार बिरोबा माळ शिरोळ हे बांधकाम करीत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते.
त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे









