प्रतिनिधी / बांदा:
बांदा शहरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कट्टा कॉर्नर येथील सुजाता फोटो स्टुडिओत बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास माकड शिरून आरसा व इतर सामानाची तोडफोड केली. मालक अजित दळवी यांच्या अंगावरही माकड धावून आला, परंतु इतर दुकानदारांनी लगेच धाव घेतल्याने श्री. दळवी यांना दुखापत झाली नाही. अशा परिस्थितीत वनविभागाने माकडांच्या वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी बांद्यातील नागरिकांसह दुकानदारांमधून होत आहे.
Previous Articleठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीज तोडणी
Next Article सभासदांना म्युट करुन सभा गुंडाळली









