वार्ताहर /पणजी
गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे,समाजाला भूषणावह ठरलेल्या ज्ये÷ आणि कर्तृत्ववान व्यक्तीला यंदापासून कै. भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे व यंदाच्या पहिल्या पुरस्कारासाठी सामाजिक, सहकार क्षेत्रात योगदान दिलेले सेवाभावी डॉक्टर रामकृष्ण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी दिनी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत संस्थेच्या येथील राजाराम स्मृती सभागृहात होणाऱया विशेष कार्यक्रमात डॉ. मोरजकर यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर यांनी दिली.ते म्हणाले बांदोडकर पुण्यतिथी हा राज्यस्तरीय सोहळा असून भाऊंच्या मिरामार येथील समाधीवर पुष्पा?जली वाहून त्याची सुरवात होईल. त्यानंतर
शिक्षणतज्ञ प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुणे गोवा विद्यापीठातील इतिहास विभागातील सहाय्यक प्रोफेसर पराग पोरोब यांचे भाऊंच्या विविध पैलू?वर प्रकाश टाकणारे बीज भाषण होईल.यावेळी सन्मानीय पाहुणे म्हणून प्राचार्य गजानन मांदेकर व विशेष निमंत्रित म्हणून भाऊसाहेबांचे नातू गिरीराज वेंगुर्लेकर उपस्थित असतील. त्यानंतर गोमंतक मराठा समाजातील युवक-युवतींसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात येईल. संस्थेचे सचिव मंगेश कुंडईकर यांनी सांगितले की, प्रो. पराग पोरोब यांनी भाऊसाहेबांवर आपले पुस्तक प्रकाशित केले असून यानिमित्ताने त्यांच्या व्याख्यानातून भाऊंचे वेगळे पैलू ऐकायला मिळतील .पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष श्रीकृष्ण आसकावकर,सुनील पिळगावकर व लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते. हा सोहळा कोविडची मार्गदर्शक तत्वे पाळून होईल तेव्हा भाऊसाहेबांच्या चाहत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.









