बांदा/प्रतिनिधी-
मुसळधार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थितीनिर्माण झाली आहे. जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली सावंतटेम्ब येथे महामार्गावर पाणी आले आहे. दुचाकी वगळता बाकी सगळी वाहतूक सुरु आहे. रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने अनेक वाहनधारकांची गैरसोय झाली आहे.









