प्रतिनिधी / बांदा:
बांदा गडगेवाडी परप्रांतीय कामगार खून प्रकरणी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले टिकाव बांदा पोलिसांच्या हाती लागले आहे. बांदा पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या तेरेखोल नदीपात्रामध्ये ते आढळून आले. पोलीस कॉन्स्टेबल विठोबा सावंत यांनी तेरेखोल नदीपात्रात शोध घेतला असून त्यात त्यांना यश आले आहे मात्र अजून पर्यंत कपडे हाती लागले नसून त्याचा शोध सुरु आहे. बांदा पोलीसची टीम शोध घेत आहे. आता होडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
Previous Articleमुलांसाठी ‘सहा मिनिटांची चाल’
Next Article गोमेकॉ सुपरस्पेशालिटीमध्ये शंभर खाटांचे उद्घाटन









