वार्ताहर / बांदा
बांदा मासळी मार्केट रस्त्यावरील नाल्यामध्ये वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरींग्स सह इतर समान समान टाकत असल्याने हा भाग व या लागतचा भाग आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. त्यामूळे याकडे आरोग्य खात्याने तात्काळ लक्ष देत या बाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची मागणी येथील ग्रामस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
बांदा शहरातील बांदा कट्टा ते मासळीमार्केट रस्ता हा मोठा रहदारीचा भाग आहे. या भागातील तीन तुळशी जवळच्या नाल्यावरील मोरीखली कोणीतरी एक्सपायरी औषधासह सलाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंग, इंजेकशन्स, औषधाच्या बाटल्या, व इतर साहित्य या ठिकाणी फेकून दिले जाते. मुळातच हा भर वस्तीसह रहदारीचा भाग असण्याबरोबरच आत्ताची नव्यांने दुकानांची लाईन झाली आहे.
या बरोबरच या नाल्याठिकानी गुरे ढोरे असतात. त्यामुळे हा भाग फरच महत्वाचा आहे. शिवाय हा नाला नदीला मिळाल्यामुळे येथे टाकण्यात येनाऱ्या घातक वस्तू नदीपात्रात गेल्यावर याचा फार गंभीर परिणाम होऊ शकतो. या बरोबरच गुरांनी अशे प्लास्टिकचे सामान चावल्यास याचाही गंभीर परिणाम इतरांना भोगावा लागेल.
खरे पाहता असे वापरण्यात आलेल्या सामानाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायच्या सूचना संबधितांना दिलेल्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून अश्याप्रकारे बेजबाबदारपणे इतरांच्या जीवाची काळजी न करता फेकणाऱ्यांच्या या कृत्याबाबत या भागातील ग्रामस्थांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त करतानाच या कडे सबंधीत विभागाने तात्काळ लक्ष देत या बाबतच्या सूचना देण्याची विनंती करण्यात येत आहे.
Previous Articleमल्लनिस्सारण प्रकल्पाची चौकशी करताना 2012 पासून करा !
Next Article अन् त्याचा अहवाल नकारात्मक आला..









