अमेरिकास्थित शंकर सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी
बांदा / प्रतिनिधी-
बांद्याचे सुपुत्र आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले शंकर विजय सावंत यांनी बांद्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन काँसेंटरेटर भेट दिला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी शंकर यांच्या मातोश्री सुमन सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची सोय झाली आहे.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरेश पटवर्धन यांच्याकडे हा ऑक्सिजन काँसेंटरेटर सुपूर्द करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्या श्वेता कोरगांवकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच बाळा आकेरकर,ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, बांदा शहर अध्यक्ष घनश्याम सावंत, सिध्देश पावसकर, सुधीर शिरसाट, तलाठी वर्षा नाडकर्णी, सुधीर शिरसाट,सुनील धामापूरकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









