प्रतिनिधी / बांदा:
गेली कित्येक वर्ष बांदा ग्रामपंचायत मध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे व आमचा समाज कित्येक वर्षा पासून भाजप पक्षबरोबर आहे त्यामुळे मला ह्या पोटनिवडणूक मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दयावी . आमचे नेते सन्मानीय केंद्रीय मंत्री राणे साहेब व रवींद्र चव्हाण साहेब यांनी संधी दिली तर आपण बांदा भाजप पदधिकारी व कार्यकर्त्याच्या सहकार्यामुळे विजय संपादन करेन .
मी समाजकार्यात गेली कित्येक वर्ष झोकून देऊन सामाजिक कार्यरत आहे. बांदा शहरात विविध विकासकामांसाठी असो किंवा रस्त्यासाठी असो मी पक्षासोबत नेहमी आंदोलनात युवा कार्यकर्त्याना घेऊन सहभागी झालो.कोणावर अन्याय झाल्यास न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करून यापूर्वी बांदा शहर युवा अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच सध्या सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार कार्यकारणी जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत असून अनेक बेरोजगार युवकांना सावंतवाडी बांदा पंचक्रोशी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे.
भाजप पक्षाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास दिला निश्चित विजय संपादित करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
Previous Articleकेंद्र सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेणार
Next Article नागपूरची नाही तर धुळ्याची जागा बिनविरोध









