प्रतिनिधी / बांदा
इन्सुली येथील 46 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे गोवा बांबोळी येथे उपचारा दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. सदर तरुणाच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती मात्र तद्नंतर तो कोरोना पॉझिटीव्ह आढळला. त्याच्या कोरोनाच्या वृत्ताने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इन्सुली येथील तरुण एका वाहनावर चालक म्हणून कामाला होता. दोन दिवसापूर्वी तो म्हापसा येथे पेट्रोल पंपावर चक्कर येऊन पडला. स्थानिकांनी त्याला लागलीच गोवा येथील आझीलो रुग्णालयात दाखल केले मात्र तेथुन अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबोळी येथे दाखल केले. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. दरम्यान त्याची तपासणी केली असता मेंदूत गाठ झाल्याचे निदर्शनास आले होते. यानुसार मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.शुक्रवारी त्याची पुन्हा कोरोना चाचणी केली असता त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून पुतणे असा परिवार आहे. कोरोनाने त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.









