कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी बांगलादेशी तस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर जीवघेणा हल्ला केला. नादिया जिह्यातील या हल्ल्यात रामप्रताप नामक जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्याकडील रायफल तस्करांनी हिसकावून पळ काढला आहे. रामप्रताप यांच्या डोक्मयाला आणि हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमेवरून दोन तस्कर घुसखोरीचा प्रयत्न करत असताना जवान रामप्रताप यांनी त्यांचा खंबीरपणे सामना केला. मात्र तस्करांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे जवान गंभीर जखमी झाला आहे. संबंधित हल्लेखोर तस्करांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.









