इटली मास्क फ्री होणारा पहिला युरोपीय देश
वृत्तसंस्था/ ढाका
शेजारी देश बांगलादेशमध्ये 1 जुलैपासून कठोर लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण बांगलादेशात सोमवारपासूनच कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लॉकडाउनच्या घोषणेमुळे राजधानी ढाक्यामधून हजारो कामगारांनी पलायन सुरू केले आहे.
बांगलादेशात रविवारी 5,268 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 3249 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या सध्या 8 लाख 88 हजार 406 वर पोहोचली आहे. यातील 8 लाख 04 हजार 103 जण संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर 14,172 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 70 हजारांहून अधिक आहे.
इटलीची मास्कची सक्ती नाही
इटलीत सोमवारपासून घरातून बाहेर पडताना मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली गेली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर इटली युरोपचा पहिला मास्क फ्री देश ठरला आहे. पेब्रुवारी 2020 मध्ये जगात कोरोनाचा फारसा फैलाव झालेला नसताना इटलीत मात्र मोठे संकट ओढवले होते. पण या संकटातून बाहेर पडलेल्या इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने 20 राज्यांना लो कोरोना रिस्कच्या शेणीत ठेवले आहे. म्हणजेच तेथे कोरोनाचे रुग्ण अत्यंत कमी आहेत.
ब्रिटनमध्ये रुग्ण वाढू लागले
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेचा जोर वाढू लागला आहे. दिवसभरात तेथे 14,876 नवे रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान 2,389 बाधित बरे झाले आहेत तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी देशात 18,185 नवे बाधित सापडले होते. हा आकडा मागील 140 दिवसांमध्ये सर्वाधिक ठरला होता. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी 18,153 नवे रुग्ण सापडले होते.









