ढाका
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक समुदायातील एका अज्ञाताकडून सोशल मीडियावर पोस्ट लिहल्यानंतर एका इस्लामिक समूहाने शेकडो समर्थकांच्या सहाय्याने देशातील पूर्वेकडील असणाऱया हिंदुंच्या जवळपास 70 ते 80 घरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये घरासह अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आल्याची माहिती आहे. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रातील माहितीनुसार हिफाजल ए इस्लामचे नेते मामुनुल हक यांनी हजारो अनुयायांच्या समूहाने सिलहट विभागातील सुनामगंज जिल्हय़ातील शल्ला उप जिल्हय़ातील एका हिंदु गावावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काशीपूर, नाचनी, चांदीपूर आणि काही अन्य मुस्लिम वस्तीतील गावांमधून समर्थक एकत्र येत त्यांनी हत्यारांच्या सहाय्याने एकत्र येऊन 70 ते 80 घरांची तोडफोड केली आहे. यावेळी मात्र हिंदुंनी आपला जीव वाचविण्यासाठी घरातून पळ काढला आहे. बांगलादेशातील पोलिसांच्या विशेष दलाच्या तुकडय़ा घटनास्थळावर दाखल केल्या आहेत.