वृत्तसंस्था/ हरारे
तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात यजमान झिबाब्वने 49.3 षटकांत सर्वबाद 298 धावा जमवित बांगलादेशला विजयासाठी 299 धावांचे आव्हान दिले. झिंबाब्वेतर्फे सलामीच्या छकब्वा तसेच सिकंदर रझा आणि ब्युरेल यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेतर्फे तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकविल्याने त्यांना 298 धावापर्यंत मजल मारता आली. सलामीच्या छकब्वाने 91 चेंडूत 1 षटकार 7 चौकारांसह 84, सिकंदर रझाने 54 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 57, ब्युरेल 43 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 59, मेयर्सने 38 चेंडूत 4 चौकारांसह 34, कर्णधार टेलरने 39 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या डावात 7 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे सैफुद्दीन आणि रेहमान यांनी प्रत्येकी 3, मेहमुदुल्लाने 2, टी अहमद व शकीब अल हसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेशने आपल्या डावाला दमदार सुरूवात करताना शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 20 षटकांत 1 बाद 120 धावा जमविल्या होत्या. सलामीच्या दासने 37 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. मधेवेरेने त्याला झेलबाद केले. कर्णधार तमीम इक्बाल 2 षटकार आणि 4 चौकारांसह 65 तर शकीब अल हसन 1 षटकार आणि 1 चौकारांसह 17 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे 49.3 षटकांत सर्वबाद 298 (छकब्वा 84, टेलर 28, मेयर्स 34, सिकंदर रझा 57, ब्युरेल 59, रेहमान 3-57, सैफुद्दीन 3-87, मेहमुदुल्ला 2-45, टी अहमद 1-48, शकीब अल हसन 1-46)
बांगलादेश 20 षटकांत 1 बाद 120 (तमीम इक्बाल खेळत आहे. 65, शकीब अल हसन खेळत 17, दास 32).
(धावफलक अपूर्ण)









